दि.३ डिसेंबर २००० रोजी विलेपार्ल्यातील स्वामीभक्तीनी एकत्र येऊन “रेल्वे रिक्रीएशन हॉल” स्टेशनरोड विलेपार्ले (पूर्व) येथे “श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांवर महारूद्र संपन्न करण्याचे ठरवीले. दादर येथील श्री. जयवंत हयांच्या घरी स्थापन श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पादुकांचे विलेपार्ले पुण्यनगरीत आगमन झाले. स्वामीभक्त श्री.अण्णा अलाट हयांच्या मार्गदर्शनाखाली पादुकांवर महारूद्र संपन्न झाला. अलोट संख्येने स्वामीभक्तांनी पादुकांच्या दर्शनाचा प्रसादाचा लाभ घेतला. सर्व स्वामीभक्तांचे एकच मागणे होते की विलेपार्ल्यात श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ निर्माण व्हावा. महारूद्राचे आयोजक श्री.विनय कंटक व सौ. गौरी कंटक हयांना विलेपार्ल्यात श्री स्वामींच्या मठाच्या निर्माणासाठी सर्व भक्तांना आवाहन केले भक्तांनीही प्रचंड प्रतिसाद देऊन एकाच दिवसात १ लाख रूपये देणगी देऊन मठाच्या निर्मितीत सहभाग घेतला.  अधिक माहिती …

मठाच्या वेळा

नित्यदर्शन

सकाळी ६:३० ते १२:३०
संध्याकाळी ४:०० ते १०:००

गुरुवार

सकाळी ६:३० ते १:००
संध्याकाळी ३:०० ते १०:३०

आरती : सकाळी व रात्री ठीक ८:०० वाजता

बातम्या