स्वामी समर्थ मठ विले पार्ले

मठाचा इतिहास

Whole confidentiality of service. Hire a Pro Paper Writer Right https://www.reddit.com/r/CertifiedWriters/comments/sa0cr6/livewebtutors_review/ by now skipped the suitable time to begin. You test

मठाचा इतिहास

दि.३ डिसेंबर २००० रोजी विलेपार्ल्यातील स्वामीभक्तीनी एकत्र येऊन “रेल्वे रिक्रीएशन हॉल” स्टेशनरोड विलेपार्ले (पूर्व) येथे “श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांवर महारूद्र संपन्न करण्याचे ठरवीले. दादर येथील श्री. जयवंत हयांच्या घरी स्थापन श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पादुकांचे विलेपार्ले पुण्यनगरीत आगमन झाले. स्वामीभक्त श्री.अण्णा अलाट हयांच्या मार्गदर्शनाखाली पादुकांवर महारूद्र संपन्न झाला. अलोट संख्येने स्वामीभक्तांनी पादुकांच्या दर्शनाचा प्रसादाचा लाभ घेतला. सर्व स्वामीभक्तांचे एकच मागणे होते की विलेपार्ल्यात श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ निर्माण व्हावा. महारूद्राचे आयोजक श्री.विनय कंटक व सौ. गौरी कंटक हयांना विलेपार्ल्यात श्री स्वामींच्या मठाच्या निर्माणासाठी सर्व भक्तांना आवाहन केले भक्तांनीही प्रचंड प्रतिसाद देऊन एकाच दिवसात १ लाख रूपये देणगी देऊन मठाच्या निर्मितीत सहभाग घेतला.

मठाच्या जागेसाठी शोध सुरूच होता अचानक हनुमान रोडवरील, श्रीधर बिल्डींगमागील ग्रीन कॉटेज येथे एक जागा निदर्शनास आली. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र विलेपार्ले हया धर्मादाय संस्थेतर्फे जागेची खेरेदि करण्यात आली.  महारूद्रासाठी अथक मेहनत घेणा-या स्वामी सेवकांनाही संस्थेच्या विश्वस्तपदावर स्विकृत करण्यात आले. २४ नोव्हेंबर २००० रोजी म्हणजे महारूद्रानंतर अवघ्या २१ दिवसात विलेपार्ले पुण्यनगरीत श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ स्थापन झाला, श्री स्वामी महारांजाची सुबक मुर्ती आणि तसबिरीची स्थापना करण्यात आली, २४ डिसेंबर २००० रोजी श्री महाराजांच्या मुर्तीत ब्रहमवृंदाच्या उपस्थितील प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. स्वामीभक्त  श्री. एकनाथ साठे हयांच्या मार्गदर्शनातंर्गत “प्राणप्रतिष्ठा सोहळा” संपन्न झाला.

विलेपार्ले पंचक्रोशीतील सर्व स्वामीभक्तांची रिघ मठात सुरू झाली. अनेक भक्तांना हम गया नही जिंदा है हया श्री स्वामींच्या वचनाची प्रचिती येऊ लागली. दि. २००१ रोजी रात्री १०.३० वाजता मठामधिल तसेच आसपास घरातील इलेक्ट्रीसिटी अचानक गायब झाली. सर्वत्र अंधार पसरला. श्री स्वामी महाराजांची तसबीर समयांच्या प्रकाशात फारच मोहक वाटत होती. हयावेळेस मठात श्री.विनय कंटक व श्री. नाना लांजेकर, श्री.महादेव शहापुरकर, श्री. प्र. हरिदास, श्री.अभय उगले हे स्वामीभक्त सेवा करीत असताना श्री स्वामी महाराजांनी सर्वांचे लक्ष पादुकांकडे वेधून घेतले त्या क्षणी पादुकांच्या दोन अंगठयामधून प्रकाशमान तेजस्वी असा भगव्या रंगाचा प्रकाशाचा गोळा निर्माण होऊन श्री स्वामी महाराजांच्या तसबीरीत जाऊन अंर्तधान पावला. श्री स्वामी महाराजांनी जणू तेजोस्वरूपात सेवेक-यांस दर्शन दिले. सेवेकऱ्यांची पूर्व पुण्याई फळास आली भिऊ नकोस मि पाठीशी आहे हया वचनाची प्रचिती सर्वांनाच मिळाली. त्या दिवसापासून श्री स्वामी समर्थ मठ – विलेपार्ले हया स्वामीस्थानाची महती वाढू लागली असंख्य भक्त स्वामी दर्शनास येऊ लागले, जो कोणी करेल माझे नित्य स्मरण त्या भक्तांचा भार वाहिन मि सर्वदा, हया वचनाची प्रचिती सर्व भक्तांना येत होती, येत आहे आणि सदा सर्वदा येतच राहिल.